Wednesday, 28 March 2012
IBM अर्थात International Business Machines
IBM अर्थात International Business Machines यंदा आपला शतक महोत्सव साजरा करीत आहे. यात लक्षात घेण्याजोगी बाब ही की कंपनीला यंदा म्हणजे 2011 साली 100 वर्ष होत असली तरी IBM ह्या नावाला अजून शंभर वर्षे झालेली नाहीत. जून 16, 1911 ह्या तारखेला Computing-Tabulating-Recording Company (C-T-R) स्थापन झाली. ह्या कंपनीने पुढे आपलं नाव बदललं आणि ते International Business Machines (IBM) असं केलं. CTR कंपनीची IBM झाली ती तारीख आहे फेब्रुवारी 14, 1924.
म्हणजे, जून 1911 ते फेब्रुवारी 1924 ही एकूण जवळ जवळ पावणेतेरा वर्षे CTR कंपनीची कारकीर्द आहे. पण जून 1911 ते येता जून 2011 ही IBM कंपनीची सलग 100 वर्षे कंपनीने मानणं हे अगदी योग्य आहे याचे कारणथॉमस जे वॅटसन ह्या असामान्य कर्तृत्वाच्या माणसाने 1914 ते 1956 ह्या काळात ही कंपनी खऱ्या अर्थाने घडवली. कंपनी आणि कर्मचारी यांच्यातले संबंध सौहार्दाचे असावेत यासाठी कंपन्या विविध सोयी-सुविधा देतात, कितीतरी सामाजिक उपक्रम करतात हे आपण आज पाहतो. पण आय.बी.एम. चे द्रष्टेपण पहाः 1914 साली आय.बी.एम. ने पहिल्यांदा अपंग कर्मचाऱ्याची नेमणूक केली. थॉमस जे. वॅटसन त्यावेळी जनरल मॅनेजर होते. 1915 साली कंपनीने सर्व कर्मचाऱ्यांसाठी एक घोषणा दिली - THINK.कर्मचाऱ्यांना विचार करा असं सांगणारं व्यवस्थापन वॅटसन यांनी दिलं. 1916 साली कंपनी कर्मचाऱ्यांसाठी एक शिक्षण कार्यक्रम तयार करण्यांत आला. पुढे सातत्याने तो राबविण्यांत आला. त्यातून 1933 साली IBM Schoolhouse ची इमारत उभी राहिली. 1933 साली 40 तासांचा आठवडा कंपनीने जाहीर केला. कारखान्यातील कामगार आणि कचेरीतील कर्मचारी सर्वांनाच तो लागू केला गेला. आज आपण 5 डे वीक झालेला पाहतो. ती दुरदृष्टी वॅटसन यांनी 1933 साली दाखवली होती. 1934 साली कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांचा ग्रुप लाईफ इन्शुरन्स उतरविण्यांत आला होता. त्या काळी कारखान्यातील कामगारांना विशिष्ट कामापुरतं (Piece work) घेण्याची पद्धत असे. वॅटसन यांनी कामगारांना मासिक पगार चालू केला. त्यामुळे कामगारांच्या कुटुंबांना एक आर्थिक स्थैर्य लाभले. 1942 साली अपंगांना प्रशिक्षण आणि नंतर नोकऱ्या देण्यासाठी एक स्वतंत्र कार्यक्रम कंपनीने चालू केला. समान न्याय देण्याच्या दृष्टीकोनातून 1943 साली एक महिला कंपनीची उपाध्यक्षा झाली. 1946 साली कंपनीने पहिल्या कृष्णवर्णीय सेल्समनची नेमणूक केली. कृष्णवर्णीयांना समान हक्क देणारा कायदा नंतर कितीतरी वर्षांनी म्हणजे 1964 साली (Civil Rights Act of 1964) पास झाला. ह्या सर्व प्रागतिक स्वरूपाच्या घटना वॅटसन यांच्या कारकीर्दीतल्या आहेत. थॉमस जे. वॅटसन यांचे 1956 साली निधन झाले. तत्पूर्वी त्यांनी कंपनीचा कारभार आपला मुलगा थॉमस वॅटसन (ज्युनियर) याच्याकडे सोपवला.
कंपनीच्या शतक महोत्सवानिमित्त कंपनीने They were there ह्या लघुपटाची निर्मिती केली आहे. 31 मिनिटांचा हा लघुपट खालील चौकोनातील Play बटणावर क्लीक करून पाहता येईल.
स्टीव्ह जॉब्स वर एक तासाची डॉक्युमेंटरी 'डिस्कव्हरी चॅनेल' वर पहा.. "iGenius: How Steve Jobs Changed The World"
रील शीर्षकाची एक तासाची नवी कोरी डॉक्युमेंटरी फिल्म 'डिस्कव्हरी चॅनेल' तर्फे तातडीने तयार करण्यांत आली असून ती येत्या रविवारी म्हणजे 16 ऑक्टोबर 2011 रोजी रात्री 8.00 वाजता पहायला मिळणार आहे. 16 ऑक्टोबर (रविवार) रात्री 8.00 ही वेळ अमेरिकन डिस्कव्हरी चॅनेलची असून ती ह्या डॉक्युमेंटरी फिल्मच्या प्रिमियर शोची मूळ तारीख आणि वेळ आहे. तेथील प्रक्षेपण संपल्यानंतर जगातील एकूण 210 देशांतील डिस्कव्हरी चॅनेल्सवर देखील ती दाखविण्यांत येणार असल्याची माहिती 'डिस्कव्हरी चॅनेल' ने दिली आहे.
अमेरिकेतील 16 ऑक्टोबरची रात्री 8.00 ते 9.00 ही एक तासांची वेळ म्हणजे भारतात 17 ऑक्टोबरच्या भल्या सकाळची 5.30 ते 6.30 ची वेळ. ह्या नंतर डिस्कव्हरी इंडियावर भारतीय वेळेनुसार
ती फिल्म नेमकी किती वाजता पहायला मिळेल याचा तपशील 'डिस्कव्हरी इंडिया' लवकरच जाहीर करील अशी अपेक्षा आहे.
ती फिल्म नेमकी किती वाजता पहायला मिळेल याचा तपशील 'डिस्कव्हरी इंडिया' लवकरच जाहीर करील अशी अपेक्षा आहे.
'डिस्कव्हरी' वरील लोकप्रिय MythBusters ह्या सदरात ही डॉक्युमेंटरी दिसणार असून अडॅम सॅवेज आणि जेमि हैनमन ही लोकप्रिय जोडी त्याचे निवेदन करणार आहे.
स्टीव्ह जॉब्सचा सहवास लाभलेल्या अनेकांच्या मुलाखती त्यात असणार आहेत. स्टीव्ह जॉब्स 19 वर्षांचा असताना, आत्मिक शांतीच्या शोधात त्याने डॅनियल कोटकी ह्या आपल्या कॉलेजमधील मित्राला बरोबर घेऊन भारताला भेट दिली होती. कोटकी हा नंतर अॅपलचा पहिला कर्मचारी म्हणून नेमलाही गेला होता. डिस्कव्हरीच्या डॉक्युमेंटरी फिल्ममध्ये डॅनियल कोटकीची मुलाखतही घेण्यांत आली आहे, आणि त्यात स्टीव्ह जॉब्सच्या भारतभेटीबद्दल महत्त्वाची माहिती मिळेल अशी अपेक्षा आहे. भारताच्या दृष्टीने डॉक्युमेंटरीतील हा भाग हे प्रमुख आकर्षण असणार आहे.
सदर डॉक्युमेंटरीची भारतातील वेळ निश्चित होताच आपल्या मित्रमंडळींना जरूर कळवा..
जगातील पत्रकारांच्या हत्यांचा डेटाबेस ठेवणारे संकेतस्थळ
मुंबईच्या गुन्हेगारी जगताची बातमी गेले अडीच दशके देणारे ज्योतिर्मय डे या पत्रकाराची हत्या झाल्याची बातमी आपण सर्वांनीच वाचली आहे. आपल्याला त्याचा धक्का बसला कारण केवळ बातम्या देतो आहे म्हणून पत्रकाराचा जीव घेतल्याची उदाहरणे आपल्याकडे विरळा आहेत. हल्ले होणं, धमक्या दिल्या जाणं अशा बाबींची सवय आपल्या पत्रकारांना झालेली होती. पण डे यांच्या हत्त्येमुळे हल्ले आणि धमक्या यांच्या पुढले पाऊल आता पडले आहे की काय हे तपासून पाहण्याची वेळ सर्वच संबंधितांवर आली आहे.
खरं तर ही समस्या आज जगभर आहे, आणि जगभरच्या पत्रकारांच्या हत्त्या आणि त्यांचेवरील अन्याय यांचा लेखाजोखा ठेवणारी एक सामाजिक संस्था अमेरिकेत आहे. त्या संस्थेचे नाव आहे ‘कमिटी टू प्रोटेक्ट जर्नालिस्टस’ (CPJ). सीपीजे ‘ना नफा’ तत्त्वावर कार्य करीत असते. येणाऱ्या देणग्यांवर तिचा कारभार चालतो. कोणतीही सरकारी मदत वा अनुदान ही संस्था जाणीवपूर्वक घेत नाही. ही संस्था आपल्याकडल्या सरासरी पत्रकार संघांपेक्षा मोठी आहे. तिथे पूर्णवेळ काम करणारा 23 जणांचा स्टाफ आहे. सीपीजेने डे यांच्या हत्त्येचीही दखल घेतली आहे. ह्या संस्थेचे www.cpj.org हे संकेतस्थळ आपण अवश्य पहा. तेथील माहिती आणि वृत्ते वाचली की डोकं चक्रावून जातं. ही काही मासलेवाईक उदाहरणे पहाः
दोनच दिवसांपूर्वीची म्हणजे 13 जून 2011 ची ही बातमी – फिलीपाईन्समध्ये मनिलापासून सुमारे 300 किलोमीटरवर असलेल्या आयरिगा शहरात रोमिओ ओलेगा ह्या पत्रकाराचा खून झाला. तो मोटर सायकलवरून कामावर जात असताना त्याच्यावर दोन गोळ्या झाडण्यांत आल्या.
पुन्हा दोन दिवसांपूर्वीची 13 जूनची बातमी, पाकिस्तानातील. पेशावरमध्ये बॉम्बस्फोट झाला त्यात दोन पत्रकार मारले गेले, पाच पत्रकार जखमी झाले. ह्याच 13 तारखेला डे यांच्या मुंबईतल्या हत्त्येची बातमी सीपीजेच्या संकेतस्थळावर आली आहे. 2011 मध्ये, म्हणजे गेल्या सहा महिन्यांत जगभरात एकूण 34 पत्रकार मारले गेले. 2010 मध्ये जगभरात एकूण 79 पत्रकारांच्या हत्त्या झाल्या. त्यातल्या सर्वाधिक म्हणजे 8 हत्त्या ह्या पाकिस्तानात झाल्या. त्या वर्षी भारतात (उत्तर प्रदेश) एकच हत्त्या नोंदली गेली ती विजय प्रताप सिंग ह्या इंडियन एक्सप्रेसच्या पत्रकाराची. नंद गोपाल गुप्ता ह्या अर्थमंत्र्यांची मुलाखत घेण्यासाठी गेलेले असताना मंत्र्याच्या घराबाहेरील मोपेडमध्ये ठेवलेल्या बॉम्बचा स्फोट झाला. त्यात विजय प्रताप यांचा मृत्यू झाला. 2009 मध्ये जगभरात 99 पत्रकार घातपातात गेले. पण त्यात सुदैवाने भारतातलं कोणीही नाही. गेल्या दहा वर्षांत म्हणजे 1992 ते 2011 ह्या काळात जगभरात 864 पत्रकारांना जीव गमवावा लागला. त्यात भारतातले 27 होते. इराकमध्ये हाच आकडा 149 आहे.
डे यांच्या खूनाच्या पार्श्वभूमीवर www.cpj.org हे एक अस्वस्थ करणारी माहिती देणारे पण उल्लेखनीय असे संकेतस्थळ आहे