वेब डिझाईन
गेल्या दोन दशकात इंटरनेटने अभूतपूर्व प्रगती करून जगातील सार्या लोकांना एकत्र आणण्याचे महत्वाचे कार्य केले आहे. केवळ परस्पर संपर्कच नव्हॆ तर धर्म, भाषा, रूढी या कृत्रिम भेदांच्या व स्थान व वेळ या नैसर्गिक बंधनांच्या बेड्या तोडून जगातील ज्ञानाचे भांडार सर्वांसाठी खुले केले आहे. साहजिकच यामुळे सर्व क्षेत्रांतील ज्ञानाच्या कक्षा रुंदावत असून उद्योग व्यवसायासाठी अमर्याद संधी उपलब्ध झाल्या आहेत. अर्थात स्पर्धाही तेवढ्याच प्रमाणात वाढली आहे. टेक्नॉलॊजीमध्ये विलक्षण वेगाने बदल होत असून जुन्या पद्धती नामशेष होत आहेत. इतर क्षेत्राप्रमाणे खुद्द इंटरनेट टेक्नॉलॉजीमध्येदेखील फार फेरबदल होत आहेत. कॅमेरा, टीव्ही, मोबाईल, नोटबुक, आयपॅड, लॅपटॉप यासारखी नवी संगणक उपकरणे व त्यासाठी लागणारे सॉफ्टवेअर प्रोग्रॅम, माहिती साठविण्याच्या व वितरण करण्याच्या पद्धती यात सतत नूतनीकरण होत असल्याने या क्षेत्राच्या अभ्यासक्रमात व पुस्तकांत असलेले ज्ञान प्रत्यही कालबाह्य होत आहे. त्यामुळे इंटरनेट हेच ज्ञानप्राप्तीचे एकमेव माध्यम बनले आहे. संपर्कासाठी इमेल व संवादसुविधा पुरेशी ठरली तरी माहितीसाठी वेबसाईट हेच इंटरनेटचे महत्वाचे साधन आहे. सुमारे दहा वर्षांपूर्वी ज्ञानदीपने आपली पहिली वेबसाईट तयार केली. त्यावेळी ती तयार करण्यासाठी, सर्व्हरवर ठेवण्यासाठी व नंतर ती इतरांना (त्यावेळी फारच थोड्या लोकांकडे कॉम्प्युटर होते) त्यांच्या संगणकावर दाखविण्यासाठी किती प्रयास पडले याचा मोठा इतिहास आहे. साधे एचटीएमएल टॅग व रंगीबेरंगी जावा अप्लेटची तयार बटने वापरून केलेल्या त्या वेबसाईटचे लोकांना त्यावेळी किती अप्रूप वाटले होते. व्हीएसएनएलच्या नेटवर्कमधील रूटरची कॅशे मेमरी फ्लश करण्यात विलंब लागत असल्याने वेबसाईटवरील बदलही सर्व ठिकाणी दिसण्यास वेळ लागत असे. सर्व जगभर ही वेबसाईट पाहता येते यावर लोकांचा विश्वास बसत नसे. आता ज्ञानदीपची सध्याची वेबसाईट खूपच वेगळी व आधुनिक आहे. रोज नवनवे प्रयोग करून वेबसाईट अधिक चांगली व कार्यक्षम करण्याचा आम्ही प्रयत्न करीत होतो. त्या काळात शाळा कॉलेजच्या केलेल्या आमच्या सार्या वेबसाईट स्टॅटिक होत्या. फ्लॅश तंत्रज्ञानाचा वापर करून वालचंद कॉलेजच्या नकाशाचे मोड्यूल बनविले व कॉलेजच्या लायब्ररीतील सर्व पुस्तकांची यादी वालचंदसांगली (walchandsangli.org) या वेबसाईटवर पाहण्याची सोय अक्सेस डाटाबेसचा वापर करून केली. परंतु केवळ चमत्कृती व कुतुहल या भावनेतून त्याकडे पाहिले गेल्याने त्याचे महत्व लोकांना उमगले नाही. श्री लिपी डायनॅमिक फॉंट व डाटाबेसव एक़एमल यांचा वापर करून मराठी माध्यमातील संस्कृतदीपिका (sanskritdeepika.org) ही वेबसाईट बनविली तेव्हा तीही पुढे कालबाह्य ठरेल याची आम्हाला कल्पना आली नव्हती. वेबसाईटच्या डिझाईन पद्धतीमध्ये नवनव्या सुधारणा होत होत्या. स्टाईल शीटचा वापर, व्हीबी स्क्रीप्ट वापरून (asp code) वेबसाईटचे सुटे भाग एकत्र जोडणे, अभिप्राय, इमेल व गेस्टबुकची सोय, फ्लॅश फोटोगॅलरी यामुळे ज्ञानदीपच्या वेबडिझाईन दर्जात बरीच सुधारणा झाली होती. तरीदेखील लोकांना या प्रभावी प्रसार व संपर्क माध्यमाची माहिती नसल्याने वेबसाईटकडे केवळ एखाद्या छापील जाहिरातीच्या दृष्टीने पाहिले गेल्याने कमी खर्चात कामचलावू वेबसाईट करण्याकडे लोकांचा ओढा होता. आजही ज्ञानदीपच्या अनेक जुन्या वेबसाईट त्याच जुन्या कालबाह्य स्वरुपात चालू आहेत. त्यांचे त्वरित आधुनिकीकरण करण्याची गरज ग्राहकांना पटवून देण्याचे अवघड काम ज्ञानदीपला आता करावे लागत आहे. सुदैवाने नवनव्या आकर्षक डायनॅमिक वेबसाईट लोकांच्या पाहण्यात आल्याने, व्यावसायिक स्पर्धा वाढल्याने, शासकीय स्तरावर इ गव्हर्नन्सचा वापर वाढल्याने व इंटरनेटचा स्पीड वाढल्याने परिस्थितीत लवकरच सुधारणा होईल अशी चिन्हे दिसत आहेत. मात्र वेबसाईट डिझाईन करणार्यांच्या संख्येतही वाढ झाल्याने येथेही तीव्र स्पर्धेला तोंड द्यावे लागणार याची ज्ञानदीपला कल्पना आहे. अनेक वर्षांचा अनुभव ही शिदोरी वेबडिझाईन क्षेत्रात पुरेशी नाही याची ज्ञानदीपला पुरेपूर जाणीव आहे. याच दृष्टीकोनातून नवे तंत्रज्ञान शिकून वेबडिझाईनमध्ये कालानुरूप सतत बदल करण्याचे धोरण आम्ही अंमलात आणले आहे.अर्थात शिकलेले वेबडिझायनर नोकरी सोडून पुण्या-मुंबईकडे गेले की पुन्हा नव्या उमेदवारांच्या शिक्षण व संशोधनासाठी वेळ खर्च करणे क्रमप्राप्त ठरते. आतापर्यंत असे १५ अनुभवी वेबडिझायनर ज्ञानदीपने इतर संस्थांना मिळवून दिले आहेत. विषयाला अनुरूप आकर्षक रंगसंगती व मजकुराची मांडणी यावर वेबसाईटचे यश अवलंबून असते. त्यामुळे ग्राफिक डिझाईनला फार महत्व आहे.वेबसाईट सर्व ब्राऊजरमध्ये व्यवस्थित एकसारखी दिसावी यासाठी विषेश प्रयत्न करावे लागतात. w3c या संस्थेकडून वेबसाईटचे परिक्षण करून तिचे प्रमाणपत्र घेता येते. डायनॅमिक मेनू, सरकत्या चित्रपट्ट्या, आकर्षक फोटो व व्हिडिओगॅलरी, साईटमॅप, टॅग क्लाऊड, विजेट, ट्विटर, फेसबुक, पिकासा इत्यादी (web 2.0) समूह संपर्क साधनांचा, गुगल मॅप, गुगल ऍड, मतपेटी, शॉपिंग कार्ट यासारख्या मोड्यूल्सचा समावेश अशा अनेक अपेक्षा आधुनिक वेबडिझाईनमध्ये पूर्ण करण्याची जबाबदारी वेब डिझाईनवर असते.सर्च इंजिन हे इंटरनेटवर माहिती शोधण्याचे मुख्य साधन आहे. त्याच्या शोधयादीत वेबसाईटचे स्थान वर येण्यासाठी सर्च इंजिन ऑफ्टिमायझेशन ही काळाची गरज बनली आहे. याशिवाय वेबसाईटवर माहिती, चित्रे वा व्हिडिओ टाकण्याचे व रंगसंगती व मांडणी बदलण्याचे काम कोणतीही टेक्निकल माहिती नसणार्या वेबसाईट मालकाला करता यावी यासाठी ब्लॉग, वर्डप्रेस, जुमला, द्रुपल यासारख्या विविध वेबसाईट व्यवस्थापन प्रणाली विकसित झाल्या आहेत. डॉट नेट, कोड इग्नायटर, कोहाना, सिंफनी, पायरोसीएमएस यासारखे आकृतीबंधही (frameworks) अधिकाधिक वापरात येत आहेत. त्यातील योग्य पर्यायाची निवड करणेही आवश्यक असते. वेबसाईटवरील माहितीत उपर्या व्यक्तीने फेरफार करू नयेत यासाठी वेबसाईटला योग्य ती सुरक्षायंत्रणाही बसवावी लागते. गेल्या काही वर्षांत ज्ञानदीपने पीएचपी, अजॅक्सचा वापर करून टेबललेस डिआयव्ही बेस्ड वेबसाईट तयार केल्या आहेत. जुमला, वर्डप्रेस व कोहाना मध्ये वेबसाईट तयार करून त्याचे व्यवस्थापन वेबसाईट मालकांकडे सुपूर्त केले आहे.बंगलोर महाराष्ट्र मंडळ, बंगलोर (mmbangalore.org.in) व लायन्स नॅब, मिरज(lneh.org) या संस्थांनी आपल्या बेबसाईट ज्ञानदीपकडून आधुनिक करून घेतल्या आहेत. उगारशुगर वर्क्सच्या वेबसाईटचे नूतनीकरण चालू आहे. इतरांनीही सध्याच्या काळातील वेबसाईटचे महत्व जाणून आपल्या आवश्यकतेनुसार वेबसाईटचे नूतनीकरण करून घ्यावे व आपल्या व्यवसाय वा उद्योगास आधुनिकतेची जोड द्यावयास हवी. आता द्विमिती तंत्रज्ञानातून त्रिमिती तंत्रज्ञानाकडे व कॉम्प्यूटरकडून मोबाईलकडे वेबसाईटची वाटचाल चालू आहे. फ्लॅश/फ्लेक्स/ एक्शन्स्क्रीप्ट ३.० याचा वापर वाढला आहे. ज्ञानदीप या क्षेत्रातही आपले स्थान मजबूत करण्याचा प्रयत्न करीत आहे. सध्या चालू असलेला परदेशातील बांधकाम क्षेत्रातील एक त्रिमिती प्रकल्प त्यादृष्टीने एक महत्वाचा टप्पा ठरणार आहे.
|