- स्वत:बद्दल सांगण्याची तयारी आरशासमोर करा. हे वारंवार करून त्यात नैसर्गिकता आणा
- हसरा चेहरा महत्त्वाचा असतो. चेहऱ्यावर प्रसन्नता असू द्या. हसर्या चेहर्याची सवय करा.
- योग्य व्यावसायीक पेहराव तुम्हाला उठाव देणारा असावा. योग्य कोट व टाय असल्यास चांगले परिणाम साधले जातात. काळी विजार व पांढरा शर्ट असल्यास उत्तम अथवा निळसर, करडे कपडे चालतात.
- ही मुलाखत माझ्यासाठीच आहे आणि मी त्यात यशस्वी होणारच आहे असाच विचार करा.
- मुलाखतीच्या ठिकाणी जाणवणाऱ्या गंभीर वातावरणात भांबावून जाऊ नका. आपण निवांत राहण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी संथ श्वसन करा ताण कमी होईल.
- तुमच्या अवगत कौशल्यांबाबत सांगताना उत्साहाने त्या मध्ये केलेले कार्य सांगा. उदाहरणे द्या.
- मुलाखतीत असत्य कधीही बोलू नका.
- मुलाखतीत घाई गडबड न करता शांत चित्ताने प्रश्नांची उत्तरे द्या.
- प्रश्न न समजल्यास विनयाने परत विचारा यात काही चुकीचे नाही.
- मुलाखतकर्त्याच्या अपेक्षांची जास्तीत जास्त पूर्तता करता येईल याची काळजी घ्या.
- मुलाखती नंतर विनम्रतेने आभार माना
व्यावसायिक मुलाखतीत बसणे, बोलण्याची पद्धत, शिष्टाचार, निटनेटकेपणा आणि प्रथमदर्शनी प्रभाव यांचा विशेष भाग असतो हे लक्षात घ्या. स्पर्धात्मक युगात इतरांपेक्षा सरस ठरण्याकरिता स्वत:चे वेगळेपण आणि विशिष्ट चमक दिसणे अत्यंत महत्त्वाचे आहे. स्वत:चा बायोडाटा किंवा करिक्युलम व्हिटे वेळोवेळी वर्तमान करत राहणे गरजेचे असते.
0 comments:
Post a Comment