मिरपूर - प्रणव मुखर्जी यांचे अर्थसंकल्पाचे भाषणाचे विश्लेषण सुरू असतानाच क्रिकेटरसिकांचे लक्ष मात्र भारत-बांगलादेश सामन्याकडे लागून राहिले होते... बजेटमध्ये आपला खिसा किती खाली होणार यापेक्षा आज तरी महाशतक होणार का, याची उत्सुकता अधिकच होती. 70...80...आणि "नर्व्हस नाइंटी'मध्ये दाखल झाल्यावर अख्खा देश टीव्हीकडे एकवटला. उत्कंठा शिगेस पोहोचली.... आणि ज्या क्षणाची क्रिकेटच्या महानायकासह संपूर्ण देश वाट पाहत होता, तो क्षण प्रत्यक्षात साकार झाला... डोळे पाणावलेल्या या "सम्राटा'च्या चेहेऱ्यावर कृतार्थतेचे भाव उमटले... 'शतकांचे शतक' या हिमालयाएवढ्या पराक्रमाचा इतिहास सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला. या ऐतिसाहिक शतकासाठी गेले वर्षभर प्रयत्न सुरू होते. कधी अर्ध्यावरून तर कधी उंबरठ्यावरूनच परतणाऱ्या सचिनला याची झळ लागत होती; पण होणाऱ्या वेदना तो दाखवून देत नव्हता. एरवी शतक केल्यानंतर आनंदाच्या भरात दोन्ही हात उंचावून आकाशाकडे पाहणाऱ्या सचिनने आजही तीच कृती केली. पण या कृतीत धन्य झाल्याची भावना अधिक होती. हेल्मेटवरील क्रिकेट मंडळाच्या "लोगो'ला बॅट लावून, हे यश माझे नाही तर अख्ख्या देशाचे आहे, हे सूचित करताना देशालाही त्याने सलाम केला. या महाशतकासाठी हा "बादशहा' एकेक सामना वेचत होता; पण महाशतकाचा मुकुट मिळत नव्हता. आशिया करंडक स्पर्धेतील आजच्या सामन्यात तरी हे यश मिळणार का, हे प्रश्नचिन्ह नेहमीप्रमाणे होते. त्याने चौकाराने खाते उघडले. त्यानंतर आणखी एक चौकार मारला तरी "तो' आत्मविश्वास दिसून येत नव्हता. पण काही वेळातच खेळपट्टीचा अंदाज आल्यावर सचिन स्थिरावला.... धावा वाढू लागल्या आणि भारतात त्याच्या चाहत्यांनी उलट गणती सुरू केली. अर्धशतक झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. भारताच्या किती धावा झाल्या यापेक्षा सचिन किती धावांवर खेळत आहे, याचीच माहिती घेणे सुरू झाले. तो नव्वदीत दाखल झाल्यावर मात्र टीव्हीसमोरून कोणीही हलत नव्हते. "हीच ती वेळ' अशी खूणगाठ बांधणारा सचिन कधी नव्हे इतका सावध होता, सतर्क होता. 97..98...99 आणि 100... महाशतक झळकले आणि महानायकाने आणखी एक शिखर सर केले. स्वप्ने नक्कीच खरी होतात. माझं एक स्वप्न पूर्ण होण्यासाठी (विश्वकरंडक विजेतेपद) 22 वर्षे वाट पाहावी लागली. मी "महाशतका'चा विचार करत नव्हतो. माध्यमांमधूनच याची चर्चा सुरू झाली. हॉटेलमध्ये, रूम सर्व्हिस आणि अजूनही ज्या ज्या ठिकाणी मी गेलो, तिथे मला याच शतकाबद्दल विचारणा होत असे. पण याआधी कितीही शतके केली असली, तरी प्रत्येक वेळी शून्यापासूनच सुरवात करावी लागते. - सचिन तेंडुलकर या शतकाची खूप दिवस वाट पाहिली. आता ही वेळ फक्त "सेलिब्रेशन'ची आहे. प्राजी, तुस्सी ग्रेट हो! - वीरेंद्र सेहवाग पराकोटीच्या कौशल्याला दिलेली ही सलामीच आहे. हा विक्रम मोडला जाईल असे मला वाटत नाही. - राहुल द्रविड | संबंधित बातम्या |
प्रतिक्रिया On 17/03/2012 12:45 PM Pradeep said: Sachin is not only a good player but also a good man. On 17/03/2012 12:36 PM uday gokhalay said: आता सचिनने द्यानेश्वरांसारखी लाक्षणिक अर्थाने समाधी घावी आणि देवळात जावून बसावे. आता खूप झाला हव्यास आणि अट्टाहास! On 17/03/2012 12:31 PM Mangesh Meher said: अभिनंदन सचिन On 17/03/2012 12:26 PM Manasi M Joshi-Deshpande said: MUST : NO WORDS TO TYPE . CONGRATULATION & BEST REGARDS FOR NEXT 100CENTUARY . On 17-03-2012 12:24 PM Vithal Goje said: Sachin is the god of Cricket........But team india is failed..... On 17/03/2012 12:18 PM Anil Rupanawar said: Excellent. wish u all d best for future............... koi kuch bhi kahe u r GOD. On 17/03/2012 12:16 PM balaji lawhale said: सचिन इस great नो word for speak ... . On 17/03/2012 12:04 PM abc said: very good sachin....................................... mast......mast...................... sachin your ..............................................shabd apure aahet....................... On 17-03-2012 11:49 AM Shubhangi Gavhale said: Great we waiting for long time.....it is alway better than too late..... On 17/03/2012 11:35 AM Gauri said: It's not 10dulkar now it's 100dulkar. On 17/03/2012 11:28 AM Ravi said: आता फक्त एवढ करा त्याला कोणी सल्ला देऊ नका,उगाच स्वताच्या मुस्कटात मारून घेताल................**** सचिन तुला मानाचा मुजरा***** On 17/03/2012 11:20 AM sharad said: गुडी पाडव्याच्या मुहूर्तावर शतकाची गुडी उभा केलीस great really .once again prove Sachin is the god of cricket. kalya dagdavarchi pandhari regh. On 17/03/2012 11:16 AM mayur said: कोण म्हणतो करणार नाय....केल्या शिवाय राहणार नाय...विष यु ओल त बेस्ट.... On 17/03/2012 11:05 AM Sandeep S said: सचिनने विक्रम केल्यावरच बाकीचे खेळाडू सुमार कामगिरी का करतात कुणास ठाऊक....पण त्या मुळे अंधश्रध्धाळू लोक याचे खपर vinakaran सचिनवरच फोडणार....सामना जिकण्यासाठी २८९ चा स्कोअर पुष्कळ होता..... On 17/03/2012 11:02 AM mahendra gaikwad said: मास्तर ब्लास्टर you are play good innings ,congratulations .................. On 17/03/2012 11:02 AM amul tamboli said: thank got to be born in the ERA of great Sachin to vitness this awesome moment, other wise I would have to read it in books only..he made all of us proud..genuine hero of World Cricket...many congrates to you boss... On 17/03/2012 11:00 AM Rushikesh said: only Sachin is an Real hero of Cricket................................................go and rock On 17/03/2012 11:00 AM Jackie said: सचिन तुझ्या महापराक्रमास मनापासून सलाम !!! तुझा हा पराक्रम फक्त भारतीय लोकांना नव्हेच तर संपूर्ण विश्वाला अभिमान वाटेल असाच आहे. चंद्रावर ठेवलेले पहिले पाऊल जसे संपूर्ण जगाचा अभिमानाचा होता, तसेच तुझे हे महाशतकहि सर्व मानव जातीसाठी भूषण देणारे आहे. झाले बहु, होतील बहु, पार यासम हाच !!! On 17/03/2012 10:59 AM Trishula said: Sachin really you are a gifted batsman..........We all are proud of you............ Congrats! On 17/03/2012 10:56 AM Punekar said: आता शतक झाले आहे म्हणजे नक्की भारत हरणार... On 17-03-2012 10:47 AM Sharad Gawade said: nice On 17/03/2012 10:46 AM Anu said: या महाराष्ट्राच्या मराठी माणसाला मानाचा मुजरा, सचिन त्रिवार अभिनंदन. क्रिकेट प्रेमींना तुझा अभिमान आहे. पुढील वाटचालीसाठी अनेक अनेक शुभेछा. On 17/03/2012 10:44 AM Pradnya,Sneha said: lai bhari sachin On 17/03/2012 10:44 AM vijay said: सचिन ने शतक केले आणि अवघा देश आनंदात नाहून गेला . सचिन तुझे अभिनदन . On 17-03-2012 10:31 AM Shrikrushna said: The Great Sachin.........! On 17/03/2012 10:23 AM manohar badlapur said: असच पुडे जा On 17/03/2012 10:22 AM Makarand Pangarkar said: जगात अनेक विक्रम प्रस्थापित होतात त्यातून देशाचे नाव उज्वल होते. तसेच आपल्या आई,वडील, गुरु यांच्या मार्गदर्शना खाली जीवनात जगावेगळे काहीतरी केल्याचा आनंद मिळतो व जीवन सार्थक झाल्या सारखे वाटते. सचिनने हेच केले आहे. एकाच ख्सेत्रात कायम राहून त्याने मातीशी इमान राखत देशाचे नाव जगाच्या नकाशावर नेले. या साठी त्याला जगातील दिग्गज गोलंदाजांशी सामना करावा लागला. हे प्र्त्तेकाला जमत नाही.पण आपल्या देशाचे आणि आई,वडील, गुरु यांचे नाव प्र्तेकानी उज्ज्वल करण्याचा निश्चित प्रयत्न करावा. टीका करणे सोपे असते On 17/03/2012 10:19 AM Ganesh said: कॉन्ग्रत्स सचिन!!!!!!!!!!!!!!!! JAY महाराष्ट्र सचिन रॉक्स!!!!!!!!!!!!!!! On 17/03/2012 10:18 AM Ajit said: In a 50 over match, God played out over ten maidens all by himself..off the 140+ deliveries he faced, there were more than 60 dot balls. On 17/03/2012 10:17 AM yogesh said: don On 17/03/2012 10:08 AM abhijeet said: आता फक्त एवढ करा त्याला कोणी सल्ला देऊ नका,उगाच स्वताच्या मुस्कटात मारून घेताल................**** सचिन तुला मानाचा मुजरा***** On 17/03/2012 10:08 AM Raju said: महाशतकाची हारलेली गुढी... On 17/03/2012 10:08 AM ss said: अजून किती हार पत्काराय्च्या एका खेळाडूच्या विक्रमासाठी.अजून थोड्या रन झाल्या असत्या तर भारत जिंकला असता पण दुर्दव्य भारतच On 17/03/2012 10:04 AM SAINATH DAMODAR MHATRE said: हे महाशतक म्हणजे तीकाकाराकांच्या कानाखाली मराठी माणसाने मारलेली सणसणीत चपराक आहे. On 17/03/2012 10:03 AM vinayak katalkar said: अभिनंदन ! On 17/03/2012 10:03 AM vishal bagkar 9764059865 said: मनःपूर्वक अभिनंदन .................जरी हे शतक सचिन ने केले तरी जगात मान आम्हा सर्व भारतीयांचीच उंचावली गेली आहे ...........हा फक्त सचिनचा मोठेपणा नाही तमाम भारतीयांचा मोठेपणा आहे तेव्हा भरतोय म्हणून विचार करून बघा ...मुर्खान सरकः विचार केलात तर काहीच साध्य होणार नाही.................जय हिंद !! On 17/03/2012 10:03 AM samadhan shinde said: सचिन इस अ ग्रेअत मन इन इंडिया On 17/03/2012 10:00 AM SAINATH DAMODAR MHATRE said: प्रथम हार्दिक अभिनंदन ................................ मला तर आता अस वाटत कि, क्रिकेटच नाव बदलून ते, सचिन अस ठेवायला हव. कारण सचिन आता असंख्य कोटी जनतेचा एकमेव हृदय बनलेला आहे. त्यामुळे सचिन आहे तर भारतीय क्रिकेट आहे. पुढील वातचालीकारिता खूप खूप खूप खूप खूप खूप शुभेच्छा. On 17-03-2012 09:57 AM chirag more said: सचिन सारखा न कोणी... न कोणी आहे ... न कोणी यापुढे होणार ... कपिल देव सारख्यांनी तोंड सांभाळून बोलाव ... सचिन आम्हाला तुझ्या अजून सेन्चुरिस पहायच्या आहेत ... बेस्ट ऑफ लक On 17/03/2012 09:55 AM amol said: सचिन तू ग्रेट आहेस. तुझा सारखा दुसरा कोणी नाही. अभिनंदन . जे कोणी तुझावर टीका करत होते त्यांना तू गप्प केलेस. असाच चांगला खेळत राहा. तुला खूप खूप शुभेच्या !!!!!!!!!! On 17/03/2012 09:52 AM abhijit bhoite said: सच On 17/03/2012 09:39 AM viwapa said: 10000 On 17/03/2012 09:29 AM Ashwin said: सचिन हा महाराष्ट्र/भारताचा कोहिनूर हिरा आहे. त्याचे मना पासून अभिनंदन. On 17/03/2012 09:29 AM Ashwin said: सचिन हा महाराष्ट्र/भारताचा कोहिनूर हिरा आहे. त्याचे मना पासून अभिनंदन. On 17/03/2012 09:28 AM Gitanjali Dalvi said: आत सर्वांचे तोंङ बंद झाले अभिनंदन On 17-03-2012 09:24 AM Nandkishor Awari said: मराठी पाउल पडते पुढे! नवयुगाचा जाणता राजा आमचा सचिन! आपल्या अतुलनीय कामगिरीसाठी कोटी कोटी प्रणाम!!! आता क्रिकेट म्हणजेच सचिन तेंडूलकर आणि फक्त तेंडूलकर. असा महापराक्रमी पुन्हा होणे नाही. आपल्या उर्ववीत आयुष्यासाठी, कुटुंबियासाठी येण्यारा मराठी नवीन वर्षासाठी खूप खूप हृदयापासून हार्दिक शुभेछ्या.. On 17/03/2012 09:24 AM Arvind said: सचिनच अभिनंदन पण गड आला पण सिंह गेला. On 17/03/2012 09:18 AM narsing said: एकदाचे महाशाताकाचे घोडे गंगेत न्हाले .सचिन आणि बीसीसीआय च्या हट्टापायी गेले वर्षभर भारतीय संघ पराभूत होत आहे आणि काळी सचिनचे शतक झाले पण भारत हारला ४४ शतकात शतक झाले तेवा धाव संख्या सरासरी ५.४५ होती रैना आणि धोनी फटकेबाजी केली म्हणून निदन२८९ झाली .सचिन आरामात आपली विकेट फेकून भारावून बसला . सचिन १० शतक आधी बाद झाला असता तर धाव संख्या ३२५ च्या वर गेली असती .विरत धावा काढण्याच्या नादात बाद झाला नसता त्याचे सलग तिसरे शतक लागले धोनीला खेळायला शेवटी चेंडूच शिल्लक रहात नाहीत . देश हे कसा विसरतो .दुर्द On 17/03/2012 09:10 AM shree said: या आधीच लिंबू टिंबू देशाबरोबर सामने ठेवले असते तर एक वर्ष वाट पहावी लागली नसती.............कदाचित १५० शतके झाली असती आजपर्यंत................. On 17/03/2012 09:08 AM sunder said: हार्दिक अभिनंदन ................ On 17/03/2012 09:02 AM Ulhas Bhor said: सचिन खरच तू महान आहेस. हे तू तुझ्या कृतीतून जगाला दाखून दिलेस. ग्रेट !!!!!!!! On 17/03/2012 08:55 AM amol said: सिंह आला पण गड गेला On 17/03/2012 08:49 AM Archana said: सचिन इस great नो word for speak ... . On 17/03/2012 08:45 AM Hemant said: "न भूतो न भविष्यति", सचिन you are the great. On 17/03/2012 08:36 AM charu said: सचिन,वकार,वासिम,jonty,warne - या क्रिकेटमधील अत्यंत महान खेळाडूंना पाहायला मिळाले,हे आमचे महत्भाग्य आहे. सचिन तेंडूलकर, मायकल शुमाकर,मायकल जाक्सन,लता मंगेशकर - ही व्यक्तिमत्वे,मानवी गुणवत्तेची परिसीमा आहेत.त्यांना सलाआआआआआम !!! On 17/03/2012 08:27 AM rupesh pansare said: Nikhil he is beyond their discovery.... On 17/03/2012 08:13 AM rupesh pansare said: Sachin, I cried for you before some moments of you century...But my Eyes bring Tears only after you DONE IT...!!! Thanks Sachin...You Are really Great... Rupesh. On 17/03/2012 08:12 AM kishan said: सचिन द grate On 17-03-2012 08:03 AM Gurunath said: क्रिकेट च्या देवाला मानाचा मुजरा... On 17/03/2012 08:01 AM Aniket Mule said: एक number जय Maharashtra On 17/03/2012 07:55 AM DHANANJAY N. SHINDE said: Mala abhiman ahe ki sachin sarkha cricket madhla dev maharashtrat janmala ala.......... On 17/03/2012 07:42 AM Sandip patil said: Sachin ha crickat cha dev ahe On 17/03/2012 07:18 AM NARALE DATTATRAY NANA said: द ग्रेट सचिन On 17/03/2012 06:29 AM Rajendra said: अभिनंदन सचिन. परंतु हे विसरू नकोस, महाशतकाची हि गुढी, भारताच्या पराभवावर उभारलेली आहे. . - On 17/03/2012 06:20 AM Nil USA said: हेच तर भारताचे दुर्द्य्वा आहे आणि सचिनचा भाग्य कि लोकांना काळात नाही कोणत्या गोष्टीला महत्व दिले पाहिजे.....Good luck India....That is why we invite pakistani president for watching cricket match in India after attack on Mumbai...... On 17-03-2012 06:01 AM swapnil jagtap said: नाद karacha नाय On 17/03/2012 05:23 AM atul said: विक्रमादित्याचा विजय असो On 17/03/2012 04:33 AM d.govind said: सचिनवर मनातून जळणाऱ्या व हस्ते परहस्ते टोमणे मारणाऱ्या सौरभ , राहुल, सेहवाग , गंभीर व इतर अनेक जसे पोंटिंग,क्लार्क,इम्रान, अक्रम , कपिल , चापेल यांना सचिन ने सणसणीत चपराक दिली आहे. On 17/03/2012 02:08 AM dadaji pradhan said: फलंदाजीचा सम्राट,त्रिवारअभिनदन,खडूस कपिल आणि सुनीलच्या कागालीला दाद दिली नाही On 17-03-2012 01:24 AM Tushar said: अभिनंदन ! |
0 comments:
Post a Comment