मुंबईच्या गुन्हेगारी जगताची बातमी गेले अडीच दशके देणारे ज्योतिर्मय डे या पत्रकाराची हत्या झाल्याची बातमी आपण सर्वांनीच वाचली आहे. आपल्याला त्याचा धक्का बसला कारण केवळ बातम्या देतो आहे म्हणून पत्रकाराचा जीव घेतल्याची उदाहरणे आपल्याकडे विरळा आहेत. हल्ले होणं, धमक्या दिल्या जाणं अशा बाबींची सवय आपल्या पत्रकारांना झालेली होती. पण डे यांच्या हत्त्येमुळे हल्ले आणि धमक्या यांच्या पुढले पाऊल आता पडले आहे की काय हे तपासून पाहण्याची वेळ सर्वच संबंधितांवर आली आहे.
खरं तर ही समस्या आज जगभर आहे, आणि जगभरच्या पत्रकारांच्या हत्त्या आणि त्यांचेवरील अन्याय यांचा लेखाजोखा ठेवणारी एक सामाजिक संस्था अमेरिकेत आहे. त्या संस्थेचे नाव आहे ‘कमिटी टू प्रोटेक्ट जर्नालिस्टस’ (CPJ). सीपीजे ‘ना नफा’ तत्त्वावर कार्य करीत असते. येणाऱ्या देणग्यांवर तिचा कारभार चालतो. कोणतीही सरकारी मदत वा अनुदान ही संस्था जाणीवपूर्वक घेत नाही. ही संस्था आपल्याकडल्या सरासरी पत्रकार संघांपेक्षा मोठी आहे. तिथे पूर्णवेळ काम करणारा 23 जणांचा स्टाफ आहे. सीपीजेने डे यांच्या हत्त्येचीही दखल घेतली आहे. ह्या संस्थेचे www.cpj.org हे संकेतस्थळ आपण अवश्य पहा. तेथील माहिती आणि वृत्ते वाचली की डोकं चक्रावून जातं. ही काही मासलेवाईक उदाहरणे पहाः
दोनच दिवसांपूर्वीची म्हणजे 13 जून 2011 ची ही बातमी – फिलीपाईन्समध्ये मनिलापासून सुमारे 300 किलोमीटरवर असलेल्या आयरिगा शहरात रोमिओ ओलेगा ह्या पत्रकाराचा खून झाला. तो मोटर सायकलवरून कामावर जात असताना त्याच्यावर दोन गोळ्या झाडण्यांत आल्या.
पुन्हा दोन दिवसांपूर्वीची 13 जूनची बातमी, पाकिस्तानातील. पेशावरमध्ये बॉम्बस्फोट झाला त्यात दोन पत्रकार मारले गेले, पाच पत्रकार जखमी झाले. ह्याच 13 तारखेला डे यांच्या मुंबईतल्या हत्त्येची बातमी सीपीजेच्या संकेतस्थळावर आली आहे. 2011 मध्ये, म्हणजे गेल्या सहा महिन्यांत जगभरात एकूण 34 पत्रकार मारले गेले. 2010 मध्ये जगभरात एकूण 79 पत्रकारांच्या हत्त्या झाल्या. त्यातल्या सर्वाधिक म्हणजे 8 हत्त्या ह्या पाकिस्तानात झाल्या. त्या वर्षी भारतात (उत्तर प्रदेश) एकच हत्त्या नोंदली गेली ती विजय प्रताप सिंग ह्या इंडियन एक्सप्रेसच्या पत्रकाराची. नंद गोपाल गुप्ता ह्या अर्थमंत्र्यांची मुलाखत घेण्यासाठी गेलेले असताना मंत्र्याच्या घराबाहेरील मोपेडमध्ये ठेवलेल्या बॉम्बचा स्फोट झाला. त्यात विजय प्रताप यांचा मृत्यू झाला. 2009 मध्ये जगभरात 99 पत्रकार घातपातात गेले. पण त्यात सुदैवाने भारतातलं कोणीही नाही. गेल्या दहा वर्षांत म्हणजे 1992 ते 2011 ह्या काळात जगभरात 864 पत्रकारांना जीव गमवावा लागला. त्यात भारतातले 27 होते. इराकमध्ये हाच आकडा 149 आहे.
डे यांच्या खूनाच्या पार्श्वभूमीवर www.cpj.org हे एक अस्वस्थ करणारी माहिती देणारे पण उल्लेखनीय असे संकेतस्थळ आहे

0 comments:
Post a Comment