Powered by Blogger.

Monday, 12 March 2012

वेबपेज म्हणजे काय?

कॉम्प्युटरवर काम करताना आपले काम कॉम्प्युटरमध्ये फाईलच्या स्वरुपामध्ये साठवितो. प्रत्येक फाईलला निरनिराळी नावे देऊन आपण आपल्या फाईल्स कॉम्प्युटरमध्ये साठवित असतो. जसे मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये साठविलेली फाईल वर्डची फाईल म्हणून ओळखली जाते. तसेच त्या फाईलला वर्डचा डब्लू (W) हे चिन्ह दिसू लागते. अशा प्रकारे कॉम्प्युटरमधिल प्रत्येक निरनिराळ्या सॉफ्टवेअरमध्ये काम करुन ती फाईल साठविल्यानंतर त्या फाईलला आपोआप त्या सॉफ्टवेअरचे चिन्ह दिले जाते.
इंटरनेटवरील वेबसाइटच्या फाईलला वेबपेज असे म्हणतात. खरंतर त्या वेबसाइटच्या फाईलला फाईल न म्हणता वेबसाइटचे पान म्हणजेच इंग्रजीमध्ये पेज असे म्हटले जाते. म्हणूनच वेबसाइटवरील पेजला वेबपेज असे म्हणतात.
पूर्वी वेबसाइटची पाने म्हणजेच वेबपेज एचटीएमएल (HTML) प्रकाराची होती. नंतर वेबसाइटमध्ये झालेल्या प्रगतीमध्ये एचटीएमएल प्रकारासोबत इतरही वेबपेजचे प्रकार बनत गेली.

0 comments:

Post a Comment