Powered by Blogger.

Friday, 16 March 2012

कुठेतरी वाचलेली हि गोष्ट......

=============== =============== =====
एक मुलगी होती साधी सरळ थोडीसी खट्याळ ....नेहमी स्वप्नांच्या दुनियेत रंगलेली....
आणि
एक मुलगा होता स्वाभिमानी हुशार नेहमी स्वतःमध्ये गुंतलेला....
अशीच दोघांची एकदा ओळख झाली
.....आणि त्यांची छान मैत्री झाली....
त्यातूनच त्याचं फोन call आणि sms चालू झाले....
ती मुलगी रोज त्या मुलाला फोन आणि sms करायची....
जर ती त्याला एक दिवस जरी फोन किंवा sms नाही केला तर तो तिच्यावर रागवायचा.
तिला विचारायचा
"का काल तू फोन नाही केला,मी वाट पाहत होतो तुझ्या फोनची".
ती त्याला त्याला म्हणायची कि,
"नाही sorry काल नाही जमल फोन करायला".
तिच्या ह्या उत्तरावर तो समाधानी नसायचा... त्यातूनच तो तिला साधपण दाखवायचा...
रोज त्यांचे फोन आणि sms चालू राहिले...त्या मुलीला त्याच्याशिवाय करमत नसे...
तिने किती हि ठरवलं कि आपण त्याला जास्त sms नाही करायचं...
तरी हि त्याला sms केल्याशिवाय तिला करमत नसे..ती त्याला sms करायची......
त्याचं बोलन वाढू लागल होत....ती एकटी असली कि त्याचाच विचारात गुंतायची...
किती हि ठरवलं कि नाही त्याचा विचार करायचा तर हि .... ती अधिका - अधिक त्याच्यात गुंतत जात होती....कारण ती
त्याच्या प्रेमात पडली आहे हे तीच तिलाच कळल नाही...........
त्याच्या विचारात असताना त्याचे बोलण आठवून स्वतःशीच एकटी हसायची....गाण गुणगुणत
बसायची.
"पाहिले मी तुला, तू मला पाहिले
ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले"
आता तिला त्याची सवय झाली होती....सतत त्याच्याशी बोलावस वाटायचं... आणि तिला
त्याच्यशी बोलल्याशिवाय राहवत नसे....त्याच्या आवाजात ती आनंदी व्हायची....
हळू हळू ती त्याच पण हि ओळखू लागली होती.... त्याच मूड कसा आहे ?.. का आहे ?
ह्या गोष्टीचा त्याला आश्चर्य वाटत होते.
तो तिला विचारायचा..."अग तुला कस कळल कि माझ मूड खराब आहे ते...?."
ती त्याला म्हणायची"मैत्री केली आहे.... थोड फार तरी कळू शकत"..
अशाने ती त्याच्यात आणखी गुंतू लागली...त्याच्य ाशिवाय तिच्या मनात कोणी नसे..
...तिला त्याच्याबद्दल सगळ माहित आहे होत.... तो कसा आहे ? त्याचा स्वभाव कसा आहे ?
त्याच दिनक्रमच तिला माहित झाल होत..तो कधी जेवतो.... घरी किती वेळ
असतो... मित्रान बरोबर किती वेळ असतो...कधी झोपतो कधी उठतो..तिला हि वाटत
होत कि तो तिच्यावर प्रेम करत आहे..... पण तस काही नव्हते.
असच एकदा तिने त्याला फोन केला....दोघांच् या पण गप्पा छान रंगल्या होत्या
..आता तिला त्याच्या मनातल जाणून घ्यायचं होत....पण काही केल्या तिला ते
जमत नव्हते...मग त्यानेच तिला विचारले"तू लग्न कधी करतेस ?".त्यावर ती
चटकन त्याला म्हणाली..."छे ! एवढ्यात लवकर नाही अजून वेळ आहे बघू"....मग
तीने त्याला विचारलं"तू कधी करतोस लग्न"..तो तीला म्हणाला"मी लग्न
करणार नाही. मी एकटाच बरा आहे..".ती खूप दुखी होते... काही क्षण तिला काहीच
सुचत नाही..हा असा का बोलत आहे..पण स्वतःला सावरून ... ती परत त्याला
विचारते..."तू असा का बोलत आहे .... तुझ्या आयुष्यात काही घडल आहे
का?"..तो अपसेट होऊन तिला म्हणतो"होय , आणि आता मला कोणीच नको मी एकटाच
बरा आहे खूप सुखी आहे".त्याच्या आयुष्यात खूप काही घडल आहे असे तिला वाटू
लागल..मग ते दोघे तो विषय बदलून दुसर्या विषयावर बोलू लागतात ... आणि ती
त्याच कोमजलेला चेहरा फुलवते...
"सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला!
रंग कधी दिसणार तुला लाजणाऱ्या फुलातला ?"
तिचा हा स्वभाव त्याला खूप आवडत... तो नकळत तिला बोलून जातो.
"तू खूप चांगली आहेस... तुझ चांगलच होईल..."
पण ती मनातल्या मनात म्हणत असे..... माझे चांगले होईल पण जेव्हा तू माझ्या सोबत असशील"
करण ती त्याला दुखी पाहू शकत नव्हती ........आता तिला तीच प्रेम व्यक्त करण जमत नव्हते...
अजून हि ते दोघे तसेच रोज बोलत आहे....रोज फोन आणि sms चालू आहे....
त्याला कळत नव्हते ती त्याच्यावर जीवापाड प्रेम करत आहे एका निष्पाप मनाने
तिला अशा आहे कि आज उद्या त्याला तीच प्रेम कळेल..आणि ती त्याला सगळ सांगेल.....
पण अजून हि तो मुलगा तिला काही बोलला नाही.... ती वाट पाहत आहे त्याची.....
आणि स्वतःला प्रश्न करत बसली आहे ...
"प्रेमवेडी राधा, साद घाली मुकुंदा
लपसी कोठे गोपाळा, गोविंदा...
तिला मिळेल का त्याच प्रेम.......... ........?
आपल्या भावना ती व्यक्त करू शकेल का त्याला....?
का अशीच वाट पाहत बसेल त्याची ..

0 comments:

Post a Comment